■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन
〉 भारतीय लष्कर ध्वज दिन
■ 07 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉 1825
बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात पहिले जहाज आले
〉 1856
पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात संपन्न झाला.
〉 1917
पहिले महायुद्ध - अमेरिकेने ऑस्ट्रिया - हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
〉 1935
प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्घारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला.
〉 1941
दुसरे महायुद्ध - जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
〉 1975
इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
〉 1988
यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
〉 1994
कन्नड साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर झाले
〉 1995
फ्रेंच गयानातील कोऊरु प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सेंट-2 सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
〉 1998
72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड झाली
〉 2016
पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके 661 विमान कोसळून47 लोकांचा मृत्यू झाला
■ 07 डिसेंबर जन्म / जयंती
〉 1902
भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म.
【मृत्यू - 07 सप्टेंबर 1979】
〉 1921
स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरु स्वामी महाराज यांचा जन्म.
【मृत्यू - 13 ऑगस्ट 2016】
〉 1957
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लॉसन यांचा जन्म.
■ 07 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1894
सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन.
【जन्म - 19 नोव्हेंबर 1805】
〉 1976
विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन.
〉 1982
संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन.
【जन्म - 17 जून 1903】
〉 1993
इव्होटी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन.
【जन्म - 18 ऑक्टोबर 1905】
〉 1997
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे निधन.
【जन्म - 16 जुलै 1913】
〉 2004
अँमवेचे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन.
【जन्म - 03 जुन 1924】
〉 2013
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.
〉 2016
पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे निधन.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!